Home चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन? मग वीज दरवाढीचा विरोध...

आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन? मग वीज दरवाढीचा विरोध का नाही?

356
0

नको ते प्रश्न सभागृहात उचलण्यापेक्षा २०० युनिट वीज बिलाचा मुद्दा कां रेटल्या जात नाही.

संपादकीय:-

किशोर जोरगेवार स्वःताला आमदार समजतात की ते खरोखरच आमदार आहे याचे संशोधन नव्याने करण्याची गरज आता वाटू लागली आहे, कारण ते सत्तापक्षातील सदस्य म्हणून विधानसभेच्या दालनात बसतात पण बाहेर मात्र जणू ते विरोधी पक्षात असल्याचे दाखवतात त्यातच त्यांच्या एका व्हायरल विडिओतून तर स्पष्ट दिसत होत की त्यांना मी आमदार असल्याचे कार्यकर्त्याला सांगावे लागत होते व दाखवून द्यावे लागले अर्थात संसदीय प्रणालीचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना स्वतःला आमदार कसा असतो हे आता शीद्ध कराव लागत आहे. पण ज्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने त्यांना २०० युनिट वीज बिलाच्या मुद्द्यांवर निवडून दिले तोच मुद्दा ते निवडून आल्यानंतर विसरले हे सत्य आहे, मात्र जेव्हां जेव्हां प्रसारमाध्यमे त्यांना त्या २०० युनिट मोफत वीजेचा प्रश्न उभा करतात तेंव्हा ते आपल्या विधानसभा सभागृहातील कामकाजात नमूद मुद्द्याच्या आडून २०० युनिट वीज बीलाचा मुद्दा चोरी छुपे घेतात व त्यांच्या प्रेस नोट चंद्रपूर च्या पत्रकारांना देऊन आपण २०० युनिट वीज बिलाचा मुद्दा सोडला नसल्याचे दाखवतात ही वस्तुस्थिती आहे.

आता सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकार तर्फे सादर केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन देतांना आमदार किशोर जोरगेवार काय बोलले तर प्रथम त्यांनी राज्यपाल हे ताडोबा येथे येऊन दर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही चंद्रपुरातील पर्यटन स्थळांना भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त करून येथील पर्यटनाला चालना मिळावी याकरीता यावर्षीच्या बजेट मध्ये वाढीव निधी देण्याची विनंती केली, चंद्रपुरातील जनता प्रदूषण युक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे. अशात शासनाने चंद्रपूरकरांना २०० युनिट पर्यंन्त वीज मोफत देण्याची मागणी सभागृहात त्यांनी केली. तसेच चंद्रपूरात कोळसा खाणी, पेपर मील, विजनिर्मीती केंद्र, सिमेंट कारखाने यासारखे मोठे उद्योग आहे. या उद्योगांचाही पर्यटनाच्या दृष्टिने विचार करुन आद्योगीक पर्यटन सुरु करण्याच्या दिशेने पर्यत्न केले जावेत, चंद्रपूर शहराला ऐतिहासीक असे परकोट आहे. त्यामुळे ऐतिहासीक पर्यटनासाठीही हा जिल्हा योग्य असून येथे विविध प्रकारचे पर्यटन सुरु करता येवू शकतात याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. हे खरे आहे. पण केवळ सभागृहात दोनदा बोलल्यावर २००युनिट वीज बिलाचा प्रश्न सुटला का? हे जरा किशोर जोरगेवारांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला सांगावे, महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जनतेने केवळ प्रश्न उचलण्यासाठी नाही तर प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आणि तुम्ही आता सत्ताधारी गटात आहात त्यामुळे तुम्ही म्हणेल त्यावर सरकारने तूम्हचा शब्दही पाळला पाहिजे आणि जर दोनदा विधानसभा सभागृहात तुम्ही उचललेल्या प्रश्नांची जर सत्ताधारी मंत्रिमंडळ दखल घेत नसेल तर तुमची तिथे कवडीचीही इज्जत होत नाही कारण तूम्हच्या शब्दाला किंमतच नाही.असा त्याचा अर्थ होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here