Home चंद्रपूर सास्ती युजी , धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ प्रकल्पग्रस्तांना न्याय...

सास्ती युजी , धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या खासदार बाळू धानोरकर

14
0

सास्ती युजी , धोपटाला ओपनकास्ट खाणीतून कोळशाची उचल करून ८२५ प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या
खासदार बाळू धानोरकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी

अभिषेक सल्लम ,चंद्रपूर : मागील पाच वर्षात शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले आहे . प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांना न्याय न देता त्यांचेवर अन्यायच केला आहे . महाजनको व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये कोळसा खरेदीबाबत करार झालेला असून यानुसार जिल्ह्यातील सास्ती , धोपटाला येथून महाजनकोने कोळसा घेतल्यास वाहतूकीचे अंतर केवळ २५-३० किमी असल्याने लॉन्डिंग कॉस्ट कमी होऊन वीज उत्पादन खर्च कमी होणार आहे . महाजनकोतर्फे वेकोलि कडे अधिक कोळशाची मागणी आहे . जर सास्ती व धोपटला खाणीतून कोळसा घेतला तर सुमारे ८२५ प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याचा जमिनीचा मोबदला व नोकऱ्यांचा प्रश्न तात्काळ निकाली लागू शकतो याकरिता येथून कोळसा उचलकरण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे .

कोल मंत्रालयातर्फे कास्ट प्लस अग्रीमेंट प्रोजेक्त रिपोर्ट सादर झालेला आहे . यानुसार NTPC गादरवारा , महाजनको MPPGCL ( MP ) या कंपन्यांनी कोळशाकरिता मागणी पत्र दिलेले होते . MPPGCL ( MP ) या कंपनीने १०,४३००० टन प्रतिवर्ष साठी बँक गॅरंटी देखील भरली आहे . परंतु अद्यापही सामंजस्य करार न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे . आधीच्या सरकारने या प्रकल्पग्रस्तांना व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे . परंतु आता हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली आहे .

कास्ट प्लस कोळसा सूचित केलेल्या किमतीपेक्षा किंचित जास्त आहे . परंतु दीर्घ कालावधी साठी कास्ट प्लस कोळसा अधीसूचित किमतीपेक्षा कमी आहे . याचा फायदा महाजनकोला भविष्यात होईल . त्यामुळे या ८२५ प्रकल्पग्रसतांना न्याय देण्याकरिता जमिनीचा मोबदला व नोकऱ्यांचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here